“…तर संपूर्ण SIR मोहीम रद्द करू”, सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला सुनावलं!
सर्वोच्च न्यायालयात बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाच्या मतदार फेरतपासणी मोहिमेवर सुनावणी झाली. आयोगाने 'आधार'ला आवश्यक कागदपत्रांमध्ये समाविष्ट न केल्याने लाखो मतदार अपात्र ठरत आहेत. न्यायालयाने फेरतपासणी मोहीम रद्द करण्याचा इशारा दिला. विरोधकांनी या मोहिमेला विरोध केला असून, योग्य तपासणीअभावी मतदारांचे हक्क हिरावले जात असल्याचा आरोप केला आहे. पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे.