फटाक्यांच्या आतिषबाजीत तीन चिमुकल्यांचा मृत्यू; ठिणगीने सिलिंडर पेटला अन्…;
हावडा जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी फटाके फोडताना आग लागल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला. उलुबेरियाच्या बाजारपारा भागात ही घटना घडली. तानिया मिस्त्री (१४), इशान धारा (६) आणि मुमताज खातून (८) अशी मृतांची नावे आहेत. फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे सिलिंडरचा स्फोट झाला आणि तीन मुलं आगीत होरपळली. आणखी दोन मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मजुमदार यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.