सर्वोत्तम जीवनमान देणारे टॉप १० देश कोणते? पाकिस्तानात काय स्थिती? भारताचा क्रमांक कितवा?
Numbeo संस्थेच्या Quality of Life Report 2025 नुसार, जीवनमानाच्या विविध निकषांवर आधारित यादीत लग्झेम्बर्ग पहिल्या स्थानी आहे. नेदरलँड्स, डेन्मार्क, ओमान हे देश अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. भारत ६२व्या स्थानी असून, त्याला १२४.४ गुण मिळाले आहेत. नायजेरिया सर्वात निकृष्ट जीवनमान असणारा देश आहे. भारतात पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानात सुधारणा झाली असली तरी प्रदूषण, लोकसंख्यावाढ आणि आरोग्य सुविधांची कमतरता या समस्या कायम आहेत.