महिला टीव्ही अँकरचा संशयास्पद मृत्यू? वडिलांनी केला ‘हा’ आरोप
४० वर्षीय तेलगू न्यूज अँकर स्वेच्छा वोर्तकारचा मृतदेह तिच्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. स्वेच्छाची मुलगी शाळेतून परतल्यावर आईला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले. बीआरएसचे अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी शोक व्यक्त केला. स्वेच्छाच्या वडिलांनी तिच्या वैयक्तिक नातेसंबंधातील तणावामुळे आत्महत्या केल्याचा दावा केला आहे.