ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ला स्थगिती, भारतावर काय परिणाम होणार?
गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफची चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी चीनसह अनेक देशांवर उच्च टॅरिफ दर लागू केले होते, ज्यामुळे अमेरिका-चीन संबंध ताणले गेले. मात्र, अमेरिकेतील न्यायालयाने ट्रम्प यांच्या निर्णयाची अंमलबजावणी स्थगित केली आहे. यामुळे भारतावरचा टॅरिफ दबाव कमी झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर ट्रम्प प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.