“अमेरिकेचं भारताशी हे वागणं म्हणजे उंदरानं…”, अमेरिकी अर्थतज्ज्ञाचा ट्रम्पना घरचा आहेर!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर अमेरिकेतून विरोधाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ रिचर्ड वोल्फ यांनी या निर्णयामुळे अमेरिकेलाच मोठा फटका बसणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मुलाखतीची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असून, त्यांनी हा निर्णय म्हणजे उंदरानं हत्तीला मारण्यासारखा असल्याची खोचक टिप्पणी केली आहे.