“…तर व्हिसा होईल रद्द”, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इशारा
अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीयांविरोधात कारवाई केल्यानंतर, अमेरिकन प्रशासनाने भारतीय विद्यार्थ्यांना इशारा दिला आहे. अमेरिकन दूतावासाने सोशल मीडिया पोस्टद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हिसाच्या अटींचे पालन करण्यास सांगितले आहे. अभ्यासक्रम सोडल्यास किंवा लेक्चर्सला गैरहजर राहिल्यास व्हिसा रद्द होऊ शकतो आणि भविष्यातील व्हिसासाठी पात्रता गमावू शकता. ट्रम्प प्रशासनाने ४,७०० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची परवानगी रद्द केली आहे.