बंगळुरु चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या २१ वर्षीय मुलाच्या वडिलांचा आर्त टाहो, “मला…”
बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानाबाहेर आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली, ज्यात ११ जणांचा मृत्यू आणि ४७ जण जखमी झाले. २१ वर्षीय भूमिक लक्ष्मण याचा मृत्यू झाला, त्याच्या वडिलांचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी टाहो फोडला आहे. मला आता इथून जायचं नाही असं भूमिक लक्ष्मणचे वडील म्हणत आहेत.