“ध्येय ठरवा आणि..”, पंतप्रधान मोदींना भेट मिळालेली ‘दारुमा डॉल’ खास का आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'भारत-जपान आर्थिक शिखर परिषदे'साठी जपान दौऱ्यावर असताना त्यांनी गुन्मा प्रांतातील ताकासाकी येथील शोरिंझान दारुमा मंदिराला भेट दिली. मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना शुभ मानली जाणारी दारुमा बाहुली भेट दिली. ही बाहुली चिकाटी, लवचिकता आणि सौभाग्य दर्शवते. दारुमा बाहुलीचा संबंध भारताशीही आहे.