अमेरिकेतच गोळ्या घालून सर्वाधिक खून का होतात? त्यामागची मानसिकता काय?
चार्ली किर्क यांचा मृत्यू जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. शस्त्र बाळगण्याचा अधिकार मिळावा यासाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ख्याती होती. बुधवारी युटा व्हॅली विद्यापीठात भाषण देत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. ३१ वर्षीय किर्क यांच्या अशा मृत्यूमूळे अमेरिकेतील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतःकडे बंदूक बाळगणं ही अमेरिकेत एक सामान्य गोष्ट मानली जाते. अमेरिकेत लोकसंख्येपेक्षा बंदुकींचीच संख्या अधिक आहे.