‘माझं लग्न कधी होणार?’, कथावाचक अनिरुद्धाचार्यांना प्रश्न विचारणं महागात पडलं
४५ वर्षीय इंद्रकुमार तिवारी यांनी लग्न न होण्याची खंत कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील एका महिलेनं इंद्रकुमार यांच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शविली. इंद्रकुमार यांना कुशीनगर येथे बोलावून त्यांच्याकडील दागिने आणि पैसे लुटले व त्यांचा खून केला.