“कमल हासन असो किंवा कुणीही…”; कन्नड भाषेच्या वादावरुन उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल
कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेते कमल हासन यांच्यावर कन्नड भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल टीका केली आहे. त्यांच्या 'ठग लाईफ' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. न्यायालयाने हासन यांना माफी मागण्यास सांगितले, परंतु त्यांनी नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग लोकांच्या भावना दुखावण्यासाठी होऊ नये. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही.