‘पाकिस्तानविरोधातलं युद्ध १० मे रोजी संपलेलं नाही’, लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांचं विधान
भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले. १० मे रोजी शस्त्रविराम झाला असला तरी पाकिस्तानविरोधातील युद्ध संपलेले नाही, असेही ते म्हणाले.