“मी कम्युनिस्ट नाही”, मीरा नायर यांचा मुलगा जोहरान ममदानींचं ट्रम्प यांना प्रत्युत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मीरा नायर यांचा मुलगा जोहरान ममदानी याला कम्युनिस्ट म्हणत त्याची खिल्ली उडवली होती. ट्रम्प यांनी म्हटलं होतं की जोहरान न्यूयॉर्कचा मेयर झाल्यास शहराला मिळणाऱ्या निधीत कपात केली जाईल. जोहरान ममदानी यांनी उत्तर देत सांगितलं की ते कम्युनिस्ट नाहीत. जोहरान ममदानी न्यूयॉर्कच्या मेयरपदासाठी डेमोक्रॅट्सचे उमेदवार आहेत.