१,३०० वर्षे प्राचीन बुद्ध मूर्तिखाली सापडला सोन्याचा खजिना!
थायलंड आणि भारतीय संस्कृतीचा ऋणानुबंध हजारो वर्षांचा आहे. भारत हा देश बौद्ध तत्त्वज्ञानाची जन्मभूमी असला तरी, हे तत्त्वज्ञान ज्या ज्या देशांच्या अंगणात वाढले, बहरास आले, त्या देशांच्या यादीत थायलंडचे नाव अग्रणी आहे. केवळ बौद्ध धर्मच नाही तर, भारतीय संस्कृतीच्या अनेक पैलूंना या देशाने आपल्या भूमीत आणि संस्कृतीत सामावून घेतले. अलीकडेच पुरातत्त्व अभ्यासकांना ज्या खजिन्याचा शोध लागला आहे, तो एका बौद्ध मंदिराच्या खाली सापडला आहे.