काश्मीरमध्ये सापडल्या १४०० वर्षे प्राचीन हिंदू मूर्ती !
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झऱ्याच्या संवर्धंनासाठी सुरू असलेल्या प्रकल्पाच्या उत्खननादरम्यान प्राचीन हिंदू मूर्ती आणि शिवलिंगांचा शोध लागल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. या मूर्ती ज्या तलावात सापडल्या तो तलाव पवित्र मानला जातो आणि हे ठिकाण तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या प्राचीन मूर्ती आणि शिवलिंगं केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाहीत, तर काश्मीरच्या ऐतिहासिक वैभवाची जिवंत साक्ष आहेत.