६० वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानला परत केला होता, जिंकलेला १८०० चौरस किलोमीटर्सचा प्रदेश!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक संघर्ष झाले आहेत आणि काश्मीर हा नेहमीच या वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण संघर्ष म्हणजे १९६५ चे युद्ध, या युद्धात भारताने लष्करी सामर्थ्यावर पाकिस्तानला पराभूत केले. 'ऑपरेशन जिब्राल्टर'मुळे या युद्धाला सुरुवात झाली. पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी करून उठाव भडकावण्याचा प्रयत्न केला. भारताने याला प्रत्युत्तर म्हणून व्यापक लष्करी प्रतिहल्ला केला. मात्र, हा संघर्ष अल्पकाळ टिकला आणि अखेरीस संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाली!