वय वर्षे ३५ ठरला चीनसाठी शाप; भारत करणार का कामगार नियुक्ती कायद्यात बदल?
चीनने ३५ वर्षांच्या शापाला तोंड देण्यासाठी शासकीय नोकऱ्यांची वयोमर्यादा वाढवली आहे. पण, भारतात अजूनही नोकरीच्या बाजारात वयावर आधारित लपलेला भेदभाव दिसून येतो. आजही भारतात या विषयावर खुल्या मनाने विचार केला जात नाही. जवळपास ३० वर्षांत पहिल्यांदाच चीन सरकारने अनेक शासकीय पदांसाठी वयोमर्यादा ३५ वरून ३८ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवीधारकांसाठी ही मर्यादा ४३ वर्षे ठेवली आहे.