४००० वर्षांपूर्वी भारतात होती क्रिप्टोकरन्सीसारखी निष्क नावाची नाणी!
भारतीय समाजात सोन्याचं स्थानही अनादिकालापासून विशेष आहे. सोनं म्हणजे संपन्नता, पवित्रता आणि अमरत्वाचं प्रतीक. वेदांमध्ये, पुराणकथांमध्ये, रामायण-महाभारतात सोन्याचे उल्लेख विपुल प्रमाणात आढळतात. आजही सोनं हे दागिने, धार्मिक विधी किंवा गुंतवणुकीच्या रूपाने प्रत्येक भारतीयाच्या जीवनात महत्त्वाचं आहे.
अशा परिस्थितीत, हडप्पा संस्कृतीत सोन्याचा वापर केवळ अलंकारापुरता नव्हे तर चलन म्हणून ‘निष्क नाण्यांच्या रूपाने’ होत होता हे नव्या संशोधनात उघड झालं आहे. ही उकल भारतीय इतिहासाच्या समजुतीचं पारडंच बदलून टाकणारी आहे.