राजस्थानमध्ये सापडलेल्या ४५०० वर्षे प्राचीन संस्कृतीमुळे इतिहासाला कलाटणी मिळणार का?
प्राचीन सरस्वती नदी आणि तिच्या काठावरची संस्कृती या विषयाला अनेक राजकीय रंग असले तरी तब्बल ८०००-५००० वर्षांपूर्वी ही नदी अस्तित्त्वात होती हे निर्विवाद सत्य आहे, तसे शास्त्रीय पुरावेही उपलब्ध आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने राजस्थानमधील डीग जिल्ह्यातील बहाज गावात ४,५०० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे पुरावे उघडकीस आणले आहेत. या उत्खननात २३ मीटर खोल भूगर्भात एक प्राचीन नदी प्रवाह आढळून आला आहे, या प्रवाहाचा संबंध ऋग्वेदात वर्णन केलेल्या पौराणिक सरस्वती नदीशी असल्याचा दावा पुरातत्त्वज्ञ करत आहेत.