भारतात सापडली हडप्पाहून प्राचीन, ९००० हजार वर्षे जुनी संस्कृती जगाचा इतिहास बदलणार का?
पुरातत्त्वीय शोध अनेकदा दीर्घकालीन संशोधनास कारणीभूत ठरतात. परंतु, भारतीय अभ्यासकांनी खंबातच्या आखातात बुडालेल्या एका शहराचा शोध लावला असून त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या शोधामुळे सुमारे ९,००० वर्षांपूर्वीच्या एका हरवलेल्या संस्कृतीविषयी मोठा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.