AirPods आणि हेडफोनच्या वापरामुळे बहिरेपणा? ‘टिनिटस’चा धोका? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Airpods, Headsphones हे आजच्या जगण्याचे अविभाज्य भाग झाले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकवेळ आपण जेवण विसरू, पण मोबाईल, एअरपाॅड्स हे बरोबर असणं आवश्यक झालं आहे. त्यामुळे दिवसभर सभोवतालच्या आवाजाबरोबर सतत कुठला ना कुठला आवाज कानावर पडतच राहतो. परंतु, हाच सततचा आवाज आपलं जगणं हिरावून घेवू शकतो याची, आपल्याला पुसटशी कल्पनाही नसते.