ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन प्रकरणात हायकोर्टाची जॉन डो ऑर्डर; काय आहे नेमकं हे प्रकरण?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आपल्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी (Personality Rights) दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही अनधिकृत वेबसाइट्स तिच्या नावाचा, फोटोचा आणि ओळखीचा परवानगीशिवाय गैरवापर करत आहेत, हे लक्षात आल्यामुळे तिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. ऐश्वर्याच्या पाठोपाठ दोन दिवसातच अभिषेक बच्चनेही दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याने व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.