ब्रेस्ट कॅन्सरनंतरही शक्य आहे स्तन पुनर्रचना; आता विमा कंपनी देईल खर्चाची साथ!
भारतात ३५ ते ४५ वयोगटातील सुमारे ११ टक्के महिलांना स्तनाचा कर्करोग होतो, तर पाश्चिमात्य देशांमध्ये हा आकडा ७ टक्के आहे. अनेक वेळा रुग्णांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, त्यामुळे निदान उशिरा होते. म्हणजे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होते. म्हणूनच लक्षणे असोत वा नसोत, नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.