खोल समुद्राच्या तळाशी चीन-अमेरिकेला सापडलाय खजिना; भारताची चिंता वाढली?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यात अमेरिकन कंपन्यांना संयुक्त राष्ट्रांच्या परवानगीशिवाय खोल समुद्रात उत्खनन करण्याची परवानगी दिली. हिंदी महासागरात अमेरिका आणि चीन यांच्यात वर्चस्वासाठी संघर्ष सुरू आहे. गेल्या काही वर्षांत हिंदी महासागर क्षेत्रातील (Indian Ocean Region - IOR) चीनचे अस्तित्त्व आणि हालचाली लक्षणीय प्रमाणात वाढल्या आहेत. चीनचा हा वाढता प्रभाव भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्याचप्रमाणे अमेरिका देखील बीजिंगच्या वाढत्या प्रभावामुळे अधिकच सतर्क आणि अस्वस्थ झाली आहे.