राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सापडले डायनासोर युगातील अवशेष!
डायनासोर हे नाव ऐकलं की, आपल्या मनात पहिल्यांदा उभं राहतं ते ज्युरासिक पार्कमधलं थरारक दृश्य. विशाल सांगाडे, गर्जना करणारे राक्षसी प्राणी आणि लाखो वर्षांपूर्वीचा गूढ काळ. या सगळ्याबद्दल माणसाला कायमच आकर्षण वाटत आलं आहे. पण, डायनासोर हे केवळ परीकथा किंवा चित्रपटांचा भाग नाहीत; ते खरंच या पृथ्वीवर कोट्यवधी वर्षं वावरले होते. याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा भारतात आला आहे. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील मेघा गावात तलावाजवळ सापडलेल्या अवशेषांनी वैज्ञानिक आणि सामान्य लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.