भारत-चीनचं ‘ड्रॅगन-एलिफंट टँगो’ म्हणजे काय?
सध्याच्या बदलत्या जागतिक राजकारणात एका बाजूस चीन बरोबर संघर्ष व दुसरीकडे व्यापार आणि दुसऱ्या बाजूस अमेरिकेबाबात व्यापार कराच्या बाबतीत तणाव आणि संरक्षण क्षेत्रात भागीदारी अशा दुहेरी पातळ्यांवर तारेवरची कसरत करत भारताची वाटचाल सुरू आहे. चीनबरोबर त्याचं तणावपूर्ण नातं आणि अमेरिकेबरोबर वाढत असलेली व्यापार आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अशा दोन्ही स्तरावरील आघाड्या भारत सांभाळत आहे. या दोन्ही बाजूंना सांभाळणं भारतासाठी केवळ गरज नसून एक मोठं आव्हानही आहे.