८३६३ कोटींवर सोन्यातील गुंतवणूक; गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय, Gold ETF ला सर्वाधिक पसंती!
सोन्याच्या किंमतींमध्ये झपाट्याने झालेली वाढ, वाढता भूराजकीय तणाव, जागतिक मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली सोन्याची खरेदी आणि आयात शुल्काशी संबंधित अनिश्चितता या सगळ्या घटकांमुळे गुंतवणूकदारांचा कल गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड्सकडे (ETFs) वाढला आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात या मालमत्तेतील गुंतवणूक सहापट वाढून विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. देशांतर्गत शेअर बाजाराची कमकुवत कामगिरी पाहता, सोनं आता अधिक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय ठरत आहे. त्यामुळे गोल्ड ETF मध्ये गुंतवणुकीचा ओघ सतत वाढताना दिसतो आहे.