हार्ट अटॅक आल्यानंतरच्या पुढच्या काही सेकंदात काय कराल? जीव कसा वाचवता येतो?
भारतामध्ये दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे होतो. Indian Heart Journal (2018) च्या अहवालानुसार, जगात सर्वाधिक अकाली मृत्यू भारतात होतात आणि त्यात हृदयविकाराचं प्रमाण लक्षणीय आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू हृदयविकारामुळे थेट होत नाही, तर वेळेत उपाय न केल्यामुळे होतो. म्हणूनच, हृदयविकाराचा झटका आल्यानंतरच्या पुढच्या काही सेकंदात काय करावं हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा नेहमीच छातीतल्या अतीतीव्र वेदनांनीच सुरू होतो असं नाही.