मृत्यू माझ्यासोबतच! भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित असे का म्हणतात?
लपून-छपून केलेला एखाद्या गुन्हेगाराचा पाठलाग, डोळ्यावर काळा गॉगल, अंगावर कोट… कुठल्याही रहस्य कथेतील वाटावे असे हे दृश्य. पण, इथे घडणारी ही कथा काही काल्पनिक नाही, हे रोज घडतंय. साहजिकच ही कथा एका गुप्तहेराची आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल. परंतु, या कथेतील गुप्तहेर साधासुधा नाही. तर ही कथा भारताच्या आधुनिक इतिहासातील पहिल्या स्त्री गुप्तहेराची आहे.