भारत आणि इस्रायल टाकणार होते पाकिस्तानवर बॉम्ब; पण, इंदिरा गांधी यांनी माघार का घेतली?
इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात त्यांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. ज्या क्षणी इस्रायलने इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केला, त्या क्षणी जगाच्या इतिहासातील विस्मरणात गेलेल्या एका धक्कादायक योजनेची आठवण पुन्हा जागी झाली. भारत आणि इस्रायल यांनी मिळून पाकिस्तानच्या कहुटा आण्विक तळावर हवाई हल्ला करण्याची धाडसी योजना आखली होती.