५ दिवसांत सहा बाळांचा किडनी फेल्युअरमुळे मृत्यू; ‘हे’ औषध ठरलं कारणीभूत!
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत सहा बालकांचा किडनी फेल्युअरमुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सुरुवातीला ही प्रकरणं केवळ हंगामी तापामुळे झाल्याचं मानलं जात होतं, मात्र परिस्थिती झपाट्याने गंभीर होत गेली. वैद्यकीय तपासणीत या मृत्यूंचं संभाव्य कारण म्हणून डायथिलीन ग्लायकोल (DEG) हे दूषित सिरप समोर आलं आहे. ही सर्व मुलं पाच वर्षांखालील होती.