मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला काश्मिरी पंडितांच्या खीर भवानी मंदिरात!
काश्मिरी पंडितांसाठी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी अत्यंत महत्त्वाची असते. या दिवशी भक्त जम्मू आणि काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातील तुलमुल्ला येथील राग्न्या देवीची मनोभावे पूजा करतात. हीच देवी खीर भवानी म्हणून प्रसिद्ध आहे.
यावर्षी खीर भवानीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्यांमध्ये पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती , नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचा समावेश होता.