जैसलमेर मराठा साम्राज्याचा भाग होतं का? इतिहासकार काय सांगतात?
NCERT च्या इतिहासाच्या पुस्तकांवरून सुरु झालेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये. आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे. एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या नव्या पाठ्यपुस्तकात १७५९ सालचा मराठा साम्राज्याचा नकाशा दाखवला आहे. या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर इतिहासकार नेमकं काय सांगतात याचाच घेतलेला हा आढावा.