पाकिस्तानी सना मीरकडून ‘आझाद काश्मीर’चा वादग्रस्त उल्लेख; इतिहास काय सांगतो?
महिला क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान झालेल्या एका विधानाने आता आणखी एक नव्या वादाचे मोहोळ उठले आहे. माजी पाकिस्तानी कर्णधार सना मीर हिने महिला विश्वचषकातील समालोचनादरम्यान नतालिया परवेजचा उल्लेख ‘आझाद काश्मीर’मधील खेळाडू असा केला आणि पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान क्रिकेट आणि भू-राजकीय ऐरणीवर आला. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर आधीच असलेल्या तणावात या विधानाने अधिकच भर घातली आहे. परंतु हा वाद फक्त खेळापुरता मर्यादित नाही.