भारतीय नौदलाच्या भीतीने पाकिस्तानी युद्धनौकांनी घेतला काढता पाय!
६ आणि ७ मेच्या दरम्यान रात्री भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादाशी संबंधित नऊ ठिकाणांवर हल्ले केले. त्यानंतर नवी दिल्लीतून इस्लामाबादच्या डीजीएमओंना (DGMO) कळवण्यात आलं होतं की, मोहिम पूर्ण झाली आहे. मात्र, पाकिस्तानने त्यानंतर प्रत्युत्तर देण्याची भाषा केली होती. परंतु, काही सॅटेलाइट इमेजेसनी पाकिस्तानचं बिंग फोडण्याचं काम केलं आहे.