पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री दलित होते; पण पाकिस्तानची निवड करूनही ते भारतात का परतले?
भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना विभाजनाच्या काळात भारताऐवजी पाकिस्तानची निवड करणारे प्रख्यात दलित नेते जोगेंद्रनाथ मंडल यांची कथा हृदय पिळवटून टाकणारी आणि तुलनेने कमी परिचित आहे. भारतातील सामाजिक व्यवस्थेबद्दल भ्रमनिरास झाल्याने आणि सुरुवातीला मोहम्मद अली जिना यांच्या आश्वासनांकडे आकृष्ट होऊन मंडल हे पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री झाले. परंतु, पाकिस्तानच्या बाबतीत धार्मिक पारडं जड ठरल्याने त्यांची अपेक्षा लवकरचं फोल ठरली आणि अखेरीस त्यांना भारतात परत यावे लागले.