रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे जखमी झाल्यास किंवा बळी गेल्यास नुकसानभरपाई कशी मिळवाल?
मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना खड्डे, उघडे मॅनहोल्स (गटारावरची झाकणं) आणि खराब रस्त्यांमुळे झालेल्या जखमा किंवा मृत्यूंसाठी नुकसानभरपाई मागण्यासाठी एक स्पष्ट आणि अंमलात आणण्यास सोपी अशी पद्धत तयार केली आहे. १५ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने (स्व-प्रेरित) एका जनहित याचिकेवर दिलेल्या सविस्तर आदेशात या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्वत्र रस्ते बांधणाऱ्या आणि त्यांची देखभाल करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व कंत्राटदारांची जबाबदारी ठरवण्याच्या दिशेने मोठं पाऊल पडलं आहे.