गांधीजींच्या दुर्मीळ व्यक्तिचित्राला लिलावात मिळाली चौपट किंमत; या चित्राचे महत्त्व काय?
महात्मा गांधींचं तैलरंगातील एक दुर्मीळ व्यक्तिचित्र (पोर्ट्रेट) ब्रिटिश कलाकार क्लेअर लीटन यांनी १९३१ साली गांधीजींच्या लंडन भेटीदरम्यान म्हणजेच दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी चितारलं होतं. तेच व्यक्तिचित्र आता १.५२ लाख पाऊंड्स (सुमारे १.७५ कोटी रुपये) एवढ्या मोठ्या किंमतीला विकलं गेलं.