मुंबई परिसरातील हलाल लाइफस्टाईलवरून वाद; पण ही इस्लामिक जीवनशैली आहे तरी काय?
अलीकडेच मुंबईजवळील नेरळ येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत ‘हलाल लाइफस्टाइल टाऊनशिप’ असा उल्लेख करण्यात आला. या जाहिरातीत हिजाबधारी महिला समान विचारांच्या कुटुंबांसाठी प्रार्थनास्थळं, सामुदायिक कार्यक्रम आणि मुलांसाठी सुरक्षित वातावरणाची हमी देताना दाखवली होती. धर्माच्या आधारावर प्रोत्साहन दिल्याचा आरोप होताच ही जाहिरात सोशल मीडियावरून हटवण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर, हलाल जीवनशैली म्हणजे काय आणि त्यामागील अर्थशास्त्र काय सांगते, याचा घेतलेला हा आढावा.