RSS prayer: नमस्ते सदा वत्सले… रा. स्व.संघाच्या (RSS) प्रार्थनेचा इतिहास आणि तिचे महत्त्व!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दैनंदिन तसेच साप्ताहिक शाखांपासून ते मोठ्या सभांपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट एका विशिष्ट प्रार्थनेने होतो. ही प्रार्थना म्हणजे फक्त काही ओळींचं गाणं नाही, तर ती संघाच्या कार्यपद्धतीचं आणि ध्येयाचं प्रतीक मानली जाते. १९३९ सालापासून आजपर्यंत अखंडपणे म्हटली जाणारी ही संस्कृतमधील १३ ओळींची ‘प्रार्थना’ संघाच्या विचारधारेचं सार मांडते. तिच्या निर्मितीमागचा इतिहास, तिला आकार देणारे व्यक्तिमत्व आणि गेल्या शतकभरात तिचं वाढलेलं महत्त्व… यातूनच या प्रार्थनेची खरी ताकद उलगडते!