राष्ट्रीय वन शहीद दिन; एका धीरोदात्त आई व तिच्या मुलींच्या बलिदानाची प्रेरणागाथा!
भारतीय संस्कृतीत निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. तरीही निसर्गाची होणारी हानी आपल्याला रोखता आलेली नाही. परंतु, आपण एखादी गोष्ट मनात आणली तर त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची तयारी असली तर काय घडू शकतं, हे सांगणारी एक घटना ११ सप्टेंबर १७३० साली जोधपूरजवळील एका छोट्याशा वाळवंटी गावात घडली. एका धाडसी स्त्रीच्या नेतृत्त्वाखाली बिष्णोई समाजातील ३६३ जणांनी खेजडीच्या झाडांची होणारी तोड थांबण्यासाठी राजाच्या सैनिकांनी केलेले प्रहार झेलले होते.