School Holiday: पावसाळ्यात असावी का शाळांना सुट्टी? ब्रिटिशांचा पायंडा आपण बदलणार का?
यापूर्वी मुंबईत पाऊस पडत नव्हता का? पण गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलामुळे त्याचं पडणं पुरतं बदललं आहे. जरा पाऊस पडला की, पाणी भरतं, शाळा सोडल्या जातात, त्याचवेळी बऱ्याच मुलांचे पालक स्वतः कुठेतरी एखाद्या ठिकाणी वा ऑफिसात अडकलेले असतात. त्यात मुलांचं टेन्शन, अशा वेळी माणसाची मानसिक ओढाताणही होते. पण, मुंबईचा वाढता आवाका आणि त्या अनुषंगाने सुरू असलेलं राजकारण पाहाता प्रश्न पडतो, किती दिवस पावसावर खापर फोडणार आपण?