बंगाल फाईल्सचे गौडबंगाल काय? “तर १० खून करा”, असं खरंच म्हणाला होता का गोपाल पाठा?
विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. १६ ऑगस्ट रोजी कोलकात्यात होणारा ट्रेलर लाँच अचानक रद्द करण्यात आला. या चित्रपटाचे कथानक १९४६ मधील ग्रेट कलकत्ता किलिंग्स आणि नोआखली दंगलींवर आधारित आहे. त्यामुळे आता गोपाल पाठा हे नाव वारंवार चर्चेत येते आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्या काळात नेमके काय घडले होते आणि त्या घटनेत गोपाल पाठाची भूमिका काय होती? याचाच घेतलेला हा आढावा.