Bone Cancer असूनही ती वाघीण शेवटपर्यंत लढली! वनसंवर्धनाची तीन पिढ्यांची परंपरा काय सांगते?
रणथंबोरच्या जंगलात ज्या वाघांनी आपली सत्ता वाढवत निसर्गाला आणि पर्यायाने संवर्धनाला हातभार लावला त्यातील एक प्रसिद्ध वंश म्हणजे मछलीचा वंश. ही रणथंबोर मधील सर्वात प्रसिद्ध वाघीण होती. तिने १४ फूट लांबीच्या मगरीला ठार मारलं, स्वतःपेक्षा बलाढ्य नर वाघांविरुद्ध लढा देत स्वतःच्या प्रदेशाचं रक्षण केलं. एक डोळा व दात गमावल्यानंतरही आपल्या पिल्लांना वाढवलं. तिचाच वंश या जंगलातील सर्वात प्रसिद्ध वंश ठरला आहे. तिच्या मुलींनी, नातींनी आपल्या आजीची परंपरा अखंड सुरू ठेवत या जंगलाची शोभा वाढवली आहे.