४३६ जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीनेच माणसांना दिली वनसंवर्धनाची प्रेरणा!
माणूस हा या भूतलावरचा सर्वाधिक क्रूर प्राणी आहे, असं म्हटलं जातं. अलबत त्याला धारधार नख नाहीत किंवा तीक्ष्ण सुळेही नाहीत. पण म्हणून तो वार करत नाही असं नाही. आपल्या स्वार्थासाठी हा प्राणी कुठल्याही थरापर्यंत जावू शकतो, हे नक्की आणि त्याचेच परिणाम ज्यावेळी भोगावे लागतात त्यावेळी मात्र सहजच समोरच्यावर दोषारोप करून मोकळा होतो. आपल्या चुकांमधून बोध घेणारे फारच थोडे असतात. हेच सांगणारा एक प्रसंग सुमारे १०० वर्षापूर्वी घडला होता…