‘ही’ भारतीय लिपी ठरली; चिनी, जपानी, कोरियन लिपींची जननी?
चिनी लोगोग्राफिक लिपी कोरियन उच्चवर्गीयांकडून वापरली जात होती, पण ती शिकणं खूप कठीण होतं. त्यामुळे सुमारे ५०० वर्षांपूर्वी सामान्य माणूस साक्षर व्हावा म्हणून एका कोरियन राजाने नवी लिपी विकसित केली. त्याच्या दरबारातील लोकांना ब्राह्मीपासून विकसित झालेल्या तमिळ लिपीची प्रेरणा मिळाली होती.