पामोलीनचा वापर शरीरासाठी हानिकारक; दोन शहरांत कुर्कुरेवरून वाद, कारण काय?
“तेच कुरकुरे, पण दोन शहरे आणि दोन वेगळे जिन्नस!” एका सोशल मीडिया पोस्टने दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये विकल्या जाणाऱ्या कुरकुरे या खाद्यपदार्थाबद्दल मोठाच प्रश्न उभा केला आहे. दिल्लीकरांच्या हातात आलेल्या पाकिटात पामोलीन तेलासारखा आरोग्याला धोकादायक घटक असल्याचा आरोप आहे, तर बेंगळुरूकरांच्या पाकिटात तोच जिन्नस नसल्याचं दिसून आलं. स्वस्ताईमुळे उद्योगात सर्वाधिक वापरलं जाणारं हे तेल हृदयरोग, लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांचं निमित्त ठरू शकतं, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.