रात्रभर मेंदू खरंच विश्रांती घेतो का? झोपेत तो काय काम करत असतो? जाणून घ्या!
माणसाचं जवळपास एक तृतीयांश आयुष्य झोपेतचं जातं, असं असलं तरीही माणूस गाढ झोपेत असताना नेमकं घडतं काय, याविषयी आजही उत्सुकता आहे. झोप ही केवळ शरीर आणि मेंदू बंद पडण्याची अवस्था आहे, असाच विश्वास १९ व्या शतकांपर्यंत शास्त्रज्ञांमध्ये होता. परंतु, संशोधनात हे स्पष्ट झालं आहे की, झोप ही निष्क्रिय अवस्था नसून मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यावश्यक अवस्था आहे. रात्र गडद होत जाते, शरीर थकलेलं असतं आणि डोळ्यांवर झोप हलकेच आपलं साम्राज्य गाजवू लागते. पण त्या शांततेच्या आड मेंदू मात्र आपलं काम करत असतो.