‘आय लव्ह मोहम्मद’- का सुरू झालाय यावरून देशभरात नवा वाद?
“आय लव्ह मोहम्मद” हे फक्त एक बॅनर होते, पण त्याभोवती उभं राहिलेलं वादळ आता राज्यांच्या सीमा ओलांडून गेलं आहे. कानपूरमध्ये लागलेली ठिणगी उन्नाव, बरेली, गोध्रा, लखनौ, काशीपूरपर्यंत पोहोचली आणि रस्त्यांवर घोषणाबाजी, मोर्चे, चकमकी आणि अटकसत्र सुरू झालं. एका साध्या घोषवाक्याभोवती एवढं मोठं राजकीय-धार्मिक वादळ का उसळलं? याचाच घेतलेला हा आढावा.